गोची...! कांद्याच्या निर्यात दरात वाढ

केंद्र सरकारने काद्याचे किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 6, 2013, 07:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्र सरकारने काद्याचे किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे.
निर्यातीसाठी एका टनाला ७१,४७२ रुपये असा विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. निर्यात बंदीची कुऱ्हाड उगारल्यास येत्या लोकसभेत याचा फटका बसू शकतो हे लक्षात घेऊन कॉंग्रेस सरकारनं ही तिरकी चाल खेळली आहे.

याआधी, कांद्याचे भाव वाढल्यामुळे कांद्याची निर्यात रोखण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विरोध दर्शविला होता. जागतिक बाजारात कृषी निर्यातदार देश म्हणून भारताची उत्तम प्रतिमा निर्माण झालेली आहे. कांदा निर्यात रोखल्याने या प्रतिमेवर विपरीत परिणाम होईल, असं कृषिमंत्र्याचं म्हणणं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.