फॅब इंडियाला दणका, पोलीस अधिकाऱ्यांचे जबाब घेणार

गोव्यातील फॅब इंडिया शो रुममधील सीसीटीव्ही प्रकरणी आज गोवा पोलीस फॅब इंडियाच्या अधिका-यांचे जबाब घेणार आहेत. 

Updated: Apr 7, 2015, 09:57 AM IST
फॅब इंडियाला दणका, पोलीस अधिकाऱ्यांचे जबाब घेणार title=

पणजी : गोव्यातील फॅब इंडिया शो रुममधील सीसीटीव्ही प्रकरणी आज गोवा पोलीस फॅब इंडियाच्या अधिका-यांचे जबाब घेणार आहेत. 

राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने फॅब इंडियाचे मुख्य अधिकारी सुब्रता दत्ता आणि व्यवस्थापकीय विल्यम बिसेल यांना समन्स जारी केले होते. या दोघांनीही होणा-या चौकशीला हजर रहाण्याचं कबूल केलंय. त्यानूसार ही चौकशी होणार आहे. 

दरम्यान या प्रकरणी म्हापसा जिल्हा न्यायालयाने फॅब इंडियाच्या व्यवस्थापिका चैताली सावंत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. घटनेनंतर सावंत बेपत्ता असून त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत शनिवारी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांनाही चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.