गँगरेपची खोटी तक्रार केल्याबद्दल महिलेला १० वर्षांची शिक्षा!

सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार केल्याबद्दल महिलेला चांगलीच किंमत चुकवावी लागली. पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल कोर्टाने तिला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. महिलेचं नाव सावित्री आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 29, 2013, 04:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार केल्याबद्दल महिलेला चांगलीच किंमत चुकवावी लागली. पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल कोर्टाने तिला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. महिलेचं नाव सावित्री आहे.
आरोपी महिलेने ८ मार्च १९९८ रोजी आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची शिक्षा तक्रार पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी छिंगा, मुश्ताक अली, सुरेस लोहार आणि बबलू अहिरवार यांना अटक केलं होतं. २२ एप्रिल १९९९ रोजी परिस्थितीसाक्ष पुराव्यांवरून आरोपी बबलूला शिक्षा फर्मावली. मात्र इतरांना पुरावे नसल्यामुळे सोडण्यात आलं.

यानंतरच्या सुनावणीत महिलेला गँगरेपची खोटी तक्रार केल्याबद्दल आणि साक्षीदरम्यान आपला जबाब फिरवल्याबद्दल विशेष न्यायालयाने सुनावणी पूर्ण झाल्यावर आरोपी सावित्रीला खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.