स्वत:च्या मुलीवर ३ वर्षापासून बलात्कार

आपल्या 21 वर्षीय मुलीवर सतत तीन वर्षे बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली.

Updated: Mar 19, 2014, 08:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोटा
आपल्या 21 वर्षीय मुलीवर सतत तीन वर्षे बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली. राजस्थानातील कोटा येथील ही घटना आहे.
दुर्दैवी गोष्ट म्हणजे, त्या कुटुंबातील इतरांना या घृणास्पद कृत्याची कल्पना असूनही त्यांनी त्याविरोधात आवाज उठविला नाही, असे चौकशीत उघडकीस आले.
पोलिसांनी काल 51 वर्षीय दिनेश सोनी याला याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीने सोमवारी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.
सोनी याचे दागिन्यांचे दुकान असून त्याला दारूचे व्यसन आहे. त्या मुलीच्या नवव्या वर्षापासून सोनीने सलग तीन वर्षे तिच्यावर बलात्कार केला. आता तिचा विवाहही झाला आहे.
होळीनिमित्त रविवारी ती मुलगी माहेरी आली होती. त्यावेळी सोनीने पुन्हा एकदा तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्या मुलीने धाडस एकवटून पोलिसांत तक्रार दाखल केली.
ही मुलगी कोटामधील शासकीय महाविद्यालयात शिकत आहे. याच वर्षी जानेवारीत तिचा विवाह झाला. त्या मुलीवर झालेल्या अत्याचारांची कल्पना तिच्या कुटुंबीयांना होती.
पीडित मुलीच्या धाकट्या बहिणीलाही वडिलांच्या अत्याचाराचा त्रास सहन करावा लागला; मात्र सोनीविरुद्ध तक्रार करण्याचे धाडस कुणीही केले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.