'रेल्वेत एफडीआयला कडाडून विरोध करणार' - संघटना

रेल्वेत परकीय गुंतवणूक करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे, या प्रस्तावाला आपण कडाडून विरोध करणार असल्याचं भारतीय रेल्वे राष्ट्रीय संघटनेनं म्हटलं आहे. रेल्वेत परकीय गुंतवणूक झाल्यास सर्व कर्मचारी संपावर जातील, असा इशारा देखिल दिला आहेत.

Updated: Jan 10, 2015, 02:31 PM IST
'रेल्वेत एफडीआयला कडाडून विरोध करणार' - संघटना title=

नागपूर : रेल्वेत परकीय गुंतवणूक करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे, या प्रस्तावाला आपण कडाडून विरोध करणार असल्याचं भारतीय रेल्वे राष्ट्रीय संघटनेनं म्हटलं आहे. रेल्वेत परकीय गुंतवणूक झाल्यास सर्व कर्मचारी संपावर जातील, असा इशारा देखिल दिला आहेत.

या प्रस्तावाविरोधात जून महिन्यांपासून सर्व रेल्वे कर्मचारी संप पुकारणार असल्याचंही संघटनेचे सरचिटणीस एम रघविह या्ंनी म्हटलंय.

पुन्हा 'ईस्ट इंडिया कंपनी'
 रेल्वे क्षेत्रात एफडीआयची कोणतीही गरज नाही, रेल्वे हळुहळू परकीयांच्या स्वाधीन करण्याचा केंद्राचा निर्णय म्हणजे देशामध्ये एकेकाळी राज्य केलेल्या 'ईस्ट इंडिया कंपनीस' पुन्हा निमंत्रण देण्यासारखेच आहे. केंद्राच्या या प्रस्तावास संघटनेचा ठाम विरोध असून, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा निर्णय अंमलात आणू दिला जाणार नाही, असा विश्वास रघविह यांनी व्यक्त केलाय.

रेल्वेच्या महत्वाच्या आणि संवेदनशील प्रकल्पांसाठी पैसे वापरतांना केंद्राने एफडीआयऐवजी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीमधून कर्ज घ्यावे, असा प्रस्ताव संघटनेचा आहे. याचबरोबर, कर्मचाऱ्यांच्या पगारामधूनही यासंदर्भात केंद्रास पैसे कापून घेता येतील, असे रघविह यांनी स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.