मोदींच्या पुतळ्याला आग लावणारे काँग्रेस कार्यकर्ते भाजले

हिमाचल प्रदेशमधील शिमलामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आगीने भाजून जखमी झाले आहेत. काँग्रेसने राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयांवर आंदोलन छेडलं आहे. 

Updated: Dec 14, 2015, 05:10 PM IST
मोदींच्या पुतळ्याला आग लावणारे काँग्रेस कार्यकर्ते भाजले title=

शिमला : हिमाचल प्रदेशमधील शिमलामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आगीने भाजून जखमी झाले आहेत. काँग्रेसने राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयांवर आंदोलन छेडलं आहे. 

(आग लागल्याचा व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

शिमल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळला, पण पुतळ्याच्या जवळच उभ्या असलेल्या पाच-सहा कार्यकर्त्यांच्या कपड्यांनाही ही आग लागली, काही सेकंदात काही कायर्कर्ते जखमी झाले.

पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात पेट्रोल टाकण्यात आलं होतं, एखाद्या लांब मशालने आग लावली जाते, पण लायटरने आग लावली आणि जास्त पेट्रोल टाकल्याने हा अपघात घडला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.