दिल्लीला पुराचा इशारा

दिल्लीला पुराचा इशारा देण्यात आला आहे. यमुना नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. यावरून दिल्लीमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. 

Updated: Aug 14, 2016, 10:42 PM IST
दिल्लीला पुराचा इशारा title=

नवी दिल्ली : दिल्लीला पुराचा इशारा देण्यात आला आहे. यमुना नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. यावरून दिल्लीमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. 

प्रतिबंधक उपाय म्हणून यमुना पूल बंद करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत यमुना नदीच्या जलपातळीमध्ये २०४  मीटरपासून २०४.३ मीटर वाढ झाली आहे. मात्र, रविवारी सकाळी पुन्हा पातळी खालावली. 

शनिवारी रात्री बुरारी भागातील २५ लोकांना आणि पूर्व दिल्लीतील एका कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यमुना पूल बंद केल्यामुळे उत्तर रेल्वेच्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असल्याचं रेल्वेच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

यमुनेची जलपातळी काही काळातच पूर्वपदावर येईल. या संदर्भात यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. धोक्‍याच्या ठिकाणी जलद कृती वाहने दाखल करण्यात आली आहेत.