ड्रोन कॅमेऱ्यानं गंगा आरतीची रेकी; चौघांना अटक

गंगा आरतीची रेकी करणाऱ्या चार जणांना वाराणसी पोलिसांनी अटक केलीय. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं हे आरतीची रेकी करीत होते. 

Updated: Jul 11, 2014, 12:44 PM IST
ड्रोन कॅमेऱ्यानं गंगा आरतीची रेकी; चौघांना अटक title=

वाराणसी : गंगा आरतीची रेकी करणाऱ्या चार जणांना वाराणसी पोलिसांनी अटक केलीय. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं हे आरतीची रेकी करीत होते. 

वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीदरम्यान ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं व्हिडिओ शूटींग करताना हे पोलिसांच्या दृष्टीस पडले. परवानगीविना शुटींग करणाऱ्या या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिवाय ते वायरलेस आणि कॅमकॉप्टरचा (ड्रोन कॅमेरा) वापर करत असल्याचंही पोलिसांना आढळलंय. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोन तरुण हरियाणाचे, एक दिल्लीचा तर एक मुंबईचा रहिवासी आहे. 

आरतीचा व्हिडिओ शुटींग करणाऱ्या या संशयितांकडून वॉकी-टॉकी, स्टील कॅमेरा आणि ड्रोन कॅमेरा हस्तगत करण्यात आलाय.  

काही दिवसांपूर्वीच इंटरनॅशनल ब्यूरोनं हाय अलर्ट जारी केला होता. यात अयोध्या, मथुरा आणि वाराणसीमध्ये दहशतवादी घटना घडणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासात ही कारवाई करण्यात आलीय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.