गॅस ३७ रुपयांनी स्वस्त

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, March 3, 2013 - 13:16

www.24taas.com,नवी दिल्ली
विनाअनुदानित गॅस सिलिंडर ३७.५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे ९ सिलिंडरचा कोटा संपलेल्या ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.
सध्या दिल्लीत ९४२ रुपयांना मिळणारे सिलिंडर आता ९०४ रुपयांना मिळेल. तर मुंबईत ९४१ रूपयांना मिळाणार सिलिंडर ९०३ रूपयांना मिळेल. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्प सादर करताना डिझेलची सबसिडी कमी करण्याचे म्हटले होते. तेल कंपन्यांनी बजेटच्या दुसऱ्याच दिवशी पेट्रोल दरवाढ केली. पाठोपाठ घाऊक डिझेलही महाग करण्यात आले.

दिल्लीत आता घाऊक डिझेल ५८.५५ रुपये प्रतिलिटर मिळेल. सरकारने जानेवारीत डिझेलवरील नियंत्रण हटवले आहे. शिवाय किरकोळ डिझेलच्या दरात दरमहा ५० पैशांपर्यंत वाढ करण्यासही मंजुरी दिली आहे. पेट्रोलच्या दरात सुमारे दीड रुपयाच्या वाढीनंतर घाऊक डिझेलही महाग झाले आहे. एक रुपया प्रतिलिटर दरवाढ करण्यात आली आहे. स्थानिक कर पाहता ही वाढ सव्वा रुपयांपर्यंत जाऊ शकेल.First Published: Sunday, March 3, 2013 - 10:33


comments powered by Disqus