सिलिंडर संपलाय, नो टेन्शन !

By Surendra Gangan | Last Updated: Monday, April 1, 2013 - 07:19

www.24taas.com,नवी दिल्ली
सिलिंडर संपलाय. आता काळजी नको. कारण तुम्ही सिलिंडर बुकींग कधीही करू शकता. त्यासाठी जी अट होती, ती रद्द करण्यात आलीय. त्यामुळे नो टेन्शन. मात्र, एक धोका आहे. नऊ सिलिंडर संपले तर जादा पैसे मोजावे लागतील.
अनुदानित कोट्यातील सिलिंडर शिल्लक राहिल्यास तो आता पुन्हा घेता येणार नाही. शिवाय सिलिंडर आता बुकिंगच्या तारखेनुसार नाही तर डिलिव्हरी केलेल्या तारखेनुसार मोजले जाणार आहेत.

बुकिंगची २१ दिवसांच्या मुदतीची अटही रद्द करण्यात आली आहे. ग्राहक आपल्या गरजेनुसार केव्हाही बुकिंग करू शकणार आहेत. मात्र १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या आर्थिक वर्षात दहाव्या सिलिंडरसाठी सुमारे ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.

First Published: Monday, April 1, 2013 - 07:19
comments powered by Disqus