नोकरी करणाऱ्यांना मिळणार कमी पगार, पीएफचा जादा भार

कर्मचाऱ्यांच्या पगारावर आता पीएफचा जादा भार पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण वेतन पीएफसाठी गृहीत धरण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. त्यामुळे कामगारांसहित त्यांना सेवेत सामावून घेणाऱ्या मालकांनाही दरमहा योगदानाचा जादा भार सोसावा लागणार आहे. 

PTI | Updated: Mar 14, 2015, 06:05 PM IST
नोकरी करणाऱ्यांना मिळणार कमी पगार, पीएफचा जादा भार  title=

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या पगारावर आता पीएफचा जादा भार पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण वेतन पीएफसाठी गृहीत धरण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. त्यामुळे कामगारांसहित त्यांना सेवेत सामावून घेणाऱ्या मालकांनाही दरमहा योगदानाचा जादा भार सोसावा लागणार आहे. 

सध्या दरमहा पीएफ योगदानाची रक्कम ही कामगारांच्या महागाई भत्त्यासह मासिक मूळ वेतनाच्या १२ टक्के इतकी आहे, तर मालकांकडून तितक्याच रकमेचे योगदान जमा होते. मात्र सरकारपुढे आलेल्या 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि बहुविध तरतुदी कायदा १८५२' मध्ये दुरुस्तीच्या मसुदा विधेयकाने वेतनाची नवीन व्याख्या केली आहे.

यामुळे नोकरी करणाऱ्यांच्या मूळ वेतन आणि सर्व भत्त्यांचा आणि रोख रकमेचा समावेश केलाय. त्यामुळे मालक आणि कामगार दोघांच्या पीएफ योगदानात वाढ होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.