१२५ कर्मचाऱ्यांना दिली स्कूटी भेट

Last Updated: Friday, April 21, 2017 - 11:41
१२५ कर्मचाऱ्यांना दिली स्कूटी भेट

सूरत : हिरा व्यापारी लक्ष्मीदास वेकारिया पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्यांनी आपल्या १२५ कर्मचाऱ्यांना स्कूटी भेट केली आहे. लक्ष्मीदास यांनी कामावर खूश झाल्याने त्यांना ही भेट दिली आहे.

यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये स्कूटी देण्यात आली. प्रत्येक स्कुटीवर तिरंगा देखील लावण्यात आला होता. वेकारिया यांनी २०१० मध्ये हिऱ्याचा व्यवसार सुरु केला होता.

गुजरातमध्ये असं करणारे वेकारिया हे ऐकटे नाही. हिरा व्यापारी सवजी भाई ढोलकिया देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना अशा भेट देत असतात.

ढोलकिया यांनी मागील वर्षी हरे कृष्णा एक्सपोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीला 400 फ्लॅट्स आणि 1260 कार गिफ्ट केली होती. कंपनीने यासाठी 51 कोटी खर्च केले होते. 56 कामगारांना दागिने देखील दिले होते.

First Published: Friday, April 21, 2017 - 11:39
comments powered by Disqus