व्हॉटसअॅपवर विकल्या जात होत्या मुली, असा झाला खुलासा

 सोशल मीडिया एकीकडे जनतेचा मजबूत आवाज बनत आहे तर काही लोक त्याचा चुकीचा वापर करत आहेत. हो, हे खरं आहे. उत्तर प्रदेशातील गाझीयाबादमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरूणींच्या विक्रीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

Updated: Jul 24, 2015, 02:27 PM IST
व्हॉटसअॅपवर विकल्या जात होत्या मुली, असा झाला खुलासा title=

गाझीयाबाद :  सोशल मीडिया एकीकडे जनतेचा मजबूत आवाज बनत आहे तर काही लोक त्याचा चुकीचा वापर करत आहेत. हो, हे खरं आहे. उत्तर प्रदेशातील गाझीयाबादमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरूणींच्या विक्रीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी कारावाई करून तीन जणांना अटक करून तरुणींची सुटका केली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधून आणलेल्या तीन मुलींचे फोटो व्हॉट्सअॅपवर 
टाकून बोली लावण्यात आली होती. त्यांना जबरदस्तीने वेश्यावृत्तीला लावण्यात आले होते. या तरूणींना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लाखो रुपयांमध्ये विकले जात होते. कसे तरी एका मुलीने आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. 

जबरदस्ती दाखवत होते ब्ल्यू फिल्म 
एक पीडित तरूणीने सांगितले की तिला अनैतिक काम करण्यासाठी दलाल जबरदस्ती दारू पाजत होते आणि ब्ल्यू फिल्म दाखवत होते. त्यांचे अश्लिल फोटो काढून सोशल साइट्सवर टाकत होते. वेगवेगळ्या व्यक्तींसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध बनविण्यासाठी सांगितले जात होते. 

पाचशे रुपयांत विकली जात होती तरूणी 
झारखंडच्या आदिवासी भागात मोठ्या संख्येत तरूणींना खरेदी करून दिल्ली-मुंबई सारख्या महानगरात विकले जाते. झारखंडमधून केवळ ५०० रुपयात मुलीला खरेदी केले जाते. जनावरांपेक्षा कमी किंमतीत तरूणींची विक्री केली जात होती. गरीबीमुळे लोक असे करत असल्याची माहिती समोर आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.