आनंदाची बातमी: सोनं-चांदी आणखी स्वस्त

डॉलरच्या मजबुतीनं मौल्यवान धातूंची मागणी कमजोर झाल्यानं राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीचा भाव अनेक वर्षांनी नीचांकी पातळीवर गेला. सोन्याचा भाव २५,८०० रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदी ३४,९०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.

Updated: Nov 9, 2014, 04:35 PM IST
आनंदाची बातमी: सोनं-चांदी आणखी स्वस्त   title=

नवी दिल्ली : डॉलरच्या मजबुतीनं मौल्यवान धातूंची मागणी कमजोर झाल्यानं राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीचा भाव अनेक वर्षांनी नीचांकी पातळीवर गेला. सोन्याचा भाव २५,८०० रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदी ३४,९०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.

आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी घट होण्याच्या शक्यतेनं आभूषण विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांची मागणी घटल्यानंही बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झाला. भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर मजबूत झाल्यानं सुरक्षित गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराला पसंती मिळाली.

जाणकारांनी सांगितलं की, जागतिक बाजारात सोन्याचा भाव एप्रिल २०१० नंतरच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. याशिवाय आगामी काळात या मौल्यवान धातूंच्या भावात आणखी घट होण्याच्या चर्चेनं आभूषण विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांच्या मागणीत मोठी घसरण झाली.

देशी बाजारावर परिणाम करणाऱ्या सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ०.९० टक्के घसरणीसह १,१३२.१६ डॉलर प्रतिऔंस झाला. एप्रिल २०१० नंतरची ही नीचांकी पातळी असून चांदीचा भाव २.३ टक्क्यांनी कमी होऊन १५.०६ डॉलर प्रतिऔंस झाला. चांदीच्या भावाची ही फेब्रुवारी २०१० नंतरची नीचांकी पातळी आहे.

चहुबाजूंनी मागणी घटल्यानं तयार चांदीचा भाव ऑक्टोबर २०१०नंतर प्रथमच ३५,००० रुपयांच्या पातळीहून खाली गेला आणि १५० रुपयांच्या घसरणीसह ३४,९०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३३० रुपयांनी कमी होऊन ३४,४०० रुपये प्रतिकिलो झाला. म्हणून चांदीच्या शिक्क्याचा भाव २,००० रुपयांनी कोसळून खरेदीसाठी ५९,००० रुपये आणि विक्रीकरता ६०,००० रुपये प्रतिशेकडा झाला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.