सोन्या-चांदीच्या भावानं गाठला गेल्या तीन महिन्यातला निचांक

सणासुदीच्या दिवसांत सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची इच्छा तुम्हालाही असेल आणि अजून तुम्ही ही संधी शोधत असाल... तर हीच आहे योग्य संधी...

Updated: Nov 14, 2015, 04:54 PM IST
सोन्या-चांदीच्या भावानं गाठला गेल्या तीन महिन्यातला निचांक  title=

नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांत सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची इच्छा तुम्हालाही असेल आणि अजून तुम्ही ही संधी शोधत असाल... तर हीच आहे योग्य संधी...

होय सोनं - चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर आहे. सोन्या - चांदीच्या भावानं गेल्या तीन महिन्यांतला निचांक गाठलाय. 

जागतिक स्तरावर क्रूड ऑईलच्या किंमती घसरण्यासोबतच २४ कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी २५,८०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आलाय. तर चांदीचा भाव ३४,५०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचलाय. चांदीच्या भावांत गेल्या तीन महिन्यांत जवळपास २५०० रुपये प्रती किलोग्रॅम घसरण झालीय. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोन्या-चांदीत गुंतवणूक करायची हीच योग्य संधी आहे. येत्या काळात लग्नाचाही सीझन जवळच आहे. त्यामुळे, ग्राहकांनीही बाजाराकडे धाव घेतलेली दिसतेय. 

सराफांच्या म्हणण्यानुसार, सोन्या-चांदीची मागणी ग्राहकांकडून कायम आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारांत होणाऱ्या बदलांमुळे सोन्या-चांदीच्या भावांत चढ-उतार पाहायला मिळतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.