सोने खरेदीचे प्रमाण घटले

ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यांमध्ये सणवार, लग्नसोहळ्यांचे प्रमाण अधिक असते. यादरम्यान सोने-चांदी खरेदीकडेही ग्राहकांचा अधिक कल असतो. मात्र यंदाच्या वर्षी लग्नसोहळ्यांच्या मोसमातही खरेदीचे प्रमाण घटलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळाचा परिणाम सोने-चांदीच्या खरेदीवर होतोय.

Updated: Nov 27, 2015, 02:58 PM IST
सोने खरेदीचे प्रमाण घटले title=

मुंबई : ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यांमध्ये सणवार, लग्नसोहळ्यांचे प्रमाण अधिक असते. यादरम्यान सोने-चांदी खरेदीकडेही ग्राहकांचा अधिक कल असतो. मात्र यंदाच्या वर्षी लग्नसोहळ्यांच्या मोसमातही खरेदीचे प्रमाण घटलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळाचा परिणाम सोने-चांदीच्या खरेदीवर होतोय.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनही घटलेय. यामुळे सोने-चांदीची होत नाहीये. या तिमाहीत सोन्या-चांदीच्या खरेदीने गेल्या आठ वर्षातील नीचांकी स्तर गाठला. सोने खरेदीचे प्रमाण घटल्याने आयातीचे प्रमाणही कमी झाले आहे. 

या तिमाहीत ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सोन्याची आयात १५० ते १७५ टन होऊ शकते. गेल्या वर्षी या दरम्यान सोन्याच्या आयातीचे प्रमाण २०१ टन इतके होते. त्यामुळे खरेदीच्या प्रमाणात ही मोठी घट मानली जात आहे. 

पूर्ण वर्षभरात जितके सोने खरेदी केले जाते त्याच्या एक तृतीयांश सोन्याची खरेदी डिसेंबर महिन्यात होते. तसेच ग्रामीण भागांमध्ये सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होते. मात्र यंदाच्या दुष्काळामुळे सोन्याच्या खरेदीवर मोठा परिणाम झालाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.