<b>जमिनीतून निघाले होते दीड क्विंटल सोने....</b>

आज काल सोन्याच्या खजिन्यामुळे उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील डोंडिया खेडा चर्चेत आहे. पण तुम्हांला माहित आहे का... १४ वर्षापूर्वी मुज्जफरपूरजवळच्या तितावी गावाजवळ असलेल्या मांडी गावात एका शेतकऱ्याला शेतात दीड क्विंटल सोने सापडले होते.

प्रशांत जाधव | Updated: Oct 19, 2013, 08:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुज्जफरपूर
आज काल सोन्याच्या खजिन्यामुळे उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील डोंडिया खेडा चर्चेत आहे. पण तुम्हांला माहित आहे का... १४ वर्षापूर्वी मुज्जफरपूरजवळच्या तितावी गावाजवळ असलेल्या मांडी गावात एका शेतकऱ्याला शेतात दीड क्विंटल सोने सापडले होते. या गावात पुरातत्व खात्याच्या पथकाने अनेक महिने या भागात ठाण मांडले होते.
आजपण या भागात सोन्याचा उल्लेख आला तर नागरिक मांडी गावाचे नाव घेणे विसरत नाही. पानीपत-खटीमा मार्गावर बघरा या गावाजवळ मांडी गावात कधी काळी सोन्यासाठी खोदकाम केले गेले होते.
हे प्रकरण १४ वर्ष जुने आहे. मांडी गावातील शेतकरी अनिल कुमार आपल्या शेतातून माती उपसत असताना सर्वात प्रथम एक चांदीने भरलेला हंडा सापडला होता. गावात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर गावातील काही नागरिकांनी त्या शेतात जाऊन खोदकाम सुरू केले. खोदकाम करताना या ठिकाणी घबाड सापडले ते म्हणजे सोने.....
प्रत्यक्षदर्शीनीं दिलेल्या माहितीनुसार सुमारे दीड क्विंटल सोने शेतातून निघाले होते. तितावी येथील पोलिस घटनास्थळी पोहचले होते. दबाव निर्माण केल्यावर काही लोकांनी सोने पोलिस स्टेशनला जमा केले.
त्यानंतर पुरातत्व खात्याचे पथक गावात पोहचले. या गावाला बरेच दिवस पोलीस छावणीचे रुप प्राप्त झाले होते. शेतात पुन्हा खोदकाम करण्यात आले, पण हाती काहीच लागले नाही. या संदर्भात ग्रामप्रधान विपीन कुमार यांनी सांगितले की, उंच टेकडीच्या खोदकामात सोने सापडले होते.
सूपर्द करण्यात आले सोन्याच्या बांगड्या
पुरातत्व विभागाने सोन्याच्या विशेष बांगड्यांची तपासणी केली. त्यांना हडप्पा संस्कृतीशी जोडून पाहिले गेले. पोलीस आणि पुरात्तव खात्याकडे असलेल्या विशेष प्रकारच्या बांगड्या होत्या, असे प्रधान यांनी सांगितले.
दोन दिवस वाटत होते सोने
मांडीमध्ये दोन दिवस सोन्याचे खोदकाम सुरू होते. पिवळ्या धातूच्या खोदकाम करणारे ग्रामस्थ दोन दिवस हा धातू एक दुसऱ्यांना देत होते. पण त्यांना हे माहीत नव्हते की हे सोने आहे.
पण जसे सोनाराने हे सोने असल्याचे सांगितल्यावर लोक आश्चर्य चकीत झाले. ज्या लोकांनी धातू समजून ज्यांना सोने वाटले ते पुन्हा घेण्यासाठी वादावादीही झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.