सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

स्थानिक बाजारातील कमी मागणीमुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोन्यांच्या किंमतीतील घसरण कायम आहे. 

Updated: May 29, 2016, 12:58 PM IST
सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण title=

मुंबई : स्थानिक बाजारातील कमी मागणीमुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोन्यांच्या किंमतीतील घसरण कायम आहे. 

शनिवारी सोन्याच्या दराने तीन महिन्यांतील नीचांकी स्तर गाठला. सोन्याचा दर प्रतिग्रॅम २८ हजार ८५० रुपयांपर्यंत घसरला. या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल ८०० रुपयांपर्यंतची घसरण पाहायला मिळाली. 

सोन्याच्या किंमतीसह चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण झालीये. चांदीच्या किंमतीत ९०० रुपयांची घसरण होत ते प्रति किलो ३९ हजार रुपयांवर पोहोचले.