डॉलर मजबूत सोने-चांदीत घसरण

जागतिक बाजारपेठेत डॉलर मजबूत पाहायला मिळाला. मात्र, याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर पाहायला मिळाला. सोने-चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली.

Updated: Mar 24, 2016, 03:24 PM IST
डॉलर मजबूत सोने-चांदीत घसरण title=

मुंबई : जागतिक बाजारपेठेत डॉलर मजबूत पाहायला मिळाला. मात्र, याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर पाहायला मिळाला. सोने-चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली.

कॉमेक्सवर सोने दरात १ टक्के घसरण होऊन १२३६ डॉलर प्रति औंस झाला. तसेच कच्चा तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली. तर नायमॅक्सवर कच्चे तेल ४१ डॉलरने खाली आले. याचा परिणाम स्थानिक बाजारात दिसून येत आहे.

सोने आणि चांदीत घसरण

बेल्जियममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकन डॉलरमध्ये घसरण पाहायला मिळाली. मात्र, चिंता व्यक्त करण्यात येत असताना डॉलरमध्ये पुन्हा मजबुती आली. याचा परिणाम सोने-चांदीवर पाहायला मिळाला. सोने मूल्य १२४० ने खाली आहे. तर चांदीच्या दरात ०.५ टक्के घट झाली. तर स्थानिक बाजारात सोने ०.६५ टक्के घसरण होऊन २८८५० रुपये प्रति तोळा झाला. तर चांदीमध्ये ०.१९ टक्के घट होऊन ३७७९० प्रति किलो भाव पाहयला मिळाला.

दुसरीकडे कच्चा तेलात कमालीची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेल १ टक्क्यांनी खाली घसरले.