सोने-चांदीमध्ये मोठी घसरण

By Surendra Gangan | Last Updated: Monday, April 15, 2013 - 12:50

www.24taas.com, नवी दिल्ली
सोने खरेदी करणा-या इच्छुकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किंमतीत आणखीन घट झालीये. सोनं प्रतितोळा २८ हजार ३०० रुपयांवर आलयं.
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत सातत्यानं घसरण होतेय. आजही ही घसरण दिसून आलीये. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळं ही घसरण झालीये. भारतात लग्नसराई सुरु असून लग्नसराईत सोनं स्वस्त झाल्यानं ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळालाय.

सोन्याच्या भावात आज कमालीची घसरण पाहायला मिळाली. आज बाजार उघडल्यावर सोन्याची किंमतीत ७५६ रूपये प्रति १० ग्रॅम घट झाली. तर चांदीची प्रति किलो २७०० रूपयांने घट झाली. गेल्या दोन दिवसातन सोन्यामध्ये २५०० रूपयांनी घट झाली. १० ग्रॅमला २७, १७३ रूपये दर आहे. हे सोने आता २५,००० रूपयांपर्यंत घाली येण्याची शक्यता आहे.
शनिवारी सोन्याच्या किमतीत घट पाहायला मिळाली. जागतिक बाजारपेठेत झाल्याल्या घसरणीमुळे सोन्याच्या किमत घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.

First Published: Monday, April 15, 2013 - 12:40
comments powered by Disqus