सोने किमतीत नोटबंदीनंतर मागणी घटल्याने मोठी घसरण

 नोटबंदीनंतर मागणीत घट झाल्याने सोने दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.  

Updated: Dec 16, 2016, 09:26 PM IST
सोने किमतीत नोटबंदीनंतर मागणी घटल्याने मोठी घसरण title=

नवी दिल्ली : अमेरिका फेडरल रिर्झव्ह बॅंकेने व्याज दरात वाढ केल्याने तसेच नोटबंदीनंतर मागणीत घट झाल्याने सोने दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या १० महिण्यात ही सर्वात मोठी घसरण आहे. दिल्ली सराफा बाजारात सोने ५०० रुपयांने घसरले आहे.

दरम्यान, मुंबईत प्रतितोळा सोने २६,९७० रुपये आहे. सोन्याबरोबरच  चांदीच्या किंमतीतही घसरण नोंदवली गेली. चांदीचा दर प्रतिकिलो ४०, ४१५ रुपये आहे. सोन्याच्या किंमतीवर नोटाबंदीमुळे परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. दिल्लीत गेल्या साडे दहा महिन्यात सोने प्रति तोळा २७,७५० रुपये झाले आहे. तर चांदीच्या दरात १३५० रुपयांनी घट झाली आहे.  चांदी दर ३९,६०० रुपयांपर्यंत घाली आला आहे.

अमेरिकन फेडरलने बुधवारी दोन दिवसीय बैठकीनंतर व्याज दरात वाढ केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने-चांदी दरात घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने बाजारात याचा परिणाम पाहायला मिळाला. मात्र, थोडीशी सुधारणा पाहायला मिळाली. ५.०५ डॉलर वाढून तो ११३२.३० डॉलर प्रति औंस झाला. अमेरिका सोने सराफा वायदा बाजार ५.४० डॉलरने वाढून ११४०.५० डॉलर प्रति औंस राहिला.

तर स्थानिक बाजारात सोने किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सोने ७०० रुपयांने खाली आले. ६ फेब्रुवारीनंतर सोने २७,७५० रुपये प्रति तोळा (१० ग्रॅम) खाली आले. जर चलनटंचाईनंतर परिस्थिती अजून अशीच राहिली तर  आणि सोने मागणीत घट झाली तर सोने दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे. तर चांदी दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. चांदी १३६५ ने घसरुन ३९,६१० रुपये किलोला भाव होता.