सोने अखेर २५ हजार रूपयांच्याही खाली

स्थानिक सराफा बाजारात सोनं सलग चौथ्या दिवशी घसरलं आहे, गुरूवारी सोने ४० रूपयांनी खाली आल्याने, अखेर सोने २५ हजाराच्या खाली आलं आहे, असं म्हणावं लागेल. कारण सोन्याचा भाव आता २४ हजार ९८० रूपयांवर आला आहे.

Updated: Aug 6, 2015, 07:28 PM IST
सोने अखेर २५ हजार रूपयांच्याही खाली title=

नवी दिल्ली  : स्थानिक सराफा बाजारात सोनं सलग चौथ्या दिवशी घसरलं आहे, गुरूवारी सोने ४० रूपयांनी खाली आल्याने, अखेर सोने २५ हजाराच्या खाली आलं आहे, असं म्हणावं लागेल. कारण सोन्याचा भाव आता २४ हजार ९८० रूपयांवर आला आहे.

जागतिक स्तरावर धातूचे भाव उतरल्याने दिल्ली सराफा बाजारात सोने, बुधवारी ११० रूपयांनी खाली आहे. बुधवारी सोने २५ हजार २० रूपयांवर होतं, आज ते २४ हजार ९८० रूपयांवर आलं आहे. चांदीच्या भावातही किलोमागे ५० रूपये कमी झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.