सोन्याच्या किंमतीत पुन्हा घट

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झालीये. नऊ वर्षानंतर प्रथमच रिझर्व्ह बँकेने ही वाढ केलीय. 

Updated: Dec 17, 2015, 01:06 PM IST
सोन्याच्या किंमतीत पुन्हा घट title=

नवी दिल्ली : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झालीये. नऊ वर्षानंतर प्रथमच रिझर्व्ह बँकेने ही वाढ केलीय. 

सोने बाजारातील घटती मागणी त्यासोबतच व्याजदरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झालाय. या वर्षात १० टक्क्यांनी सोन्यात घट झालीये. सोन्याच्या दरात ०.६ टक्क्यांची वाढ होत प्रति औंस एक हजार ६६. २० डॉलरवर पोहोचले. 

चार महानगरातील सोन्याचे दर

चेन्नई  - २३, ९१०
दिल्ली  - २४, ६५०
मुंबई -   २४, ८४०
बंगळूरू - २४, ०५०

gold rate today in mumbai

22-Carat 24-Carat Change (%)
Current Price 24840 26566.84 -0.24%
Previous Price 24900 26631.02