एक नजर सोन्या-चांदीच्या किंमतींवर...

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असली तरी दागिने आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी घटल्याचं सराफा बाजारात दिसून येतंय. 

Updated: Jan 19, 2016, 01:25 PM IST
एक नजर सोन्या-चांदीच्या किंमतींवर...  title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असली तरी दागिने आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी घटल्याचं सराफा बाजारात दिसून येतंय. 

याचमुळे, सोन्यानं दोन महिन्यांचा निच्चांक गाठलाय. सोनं १६५ रुपयांनी घसरून २६,३८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर येऊन स्थिरावलंय. तसंच चांदीही १५ रुपयांनी घसरून ३४,००० रुपये प्रति किलोवर पोहचलीय. 

बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार, घाऊक आणि किरकोळ दागिने व्यावसायिकांकडून मागणी घटल्यानं बाजारावर हा परिणाम जाणवतोय.