सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत घट

करवाचौथच्या मुहूर्तावर घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घट दिसून आलीय. दिवाळीही तोंडावर आल्यानं ग्राहकांनीही बाजाराकडे धाव घेतलीय. 

Updated: Oct 30, 2015, 08:12 PM IST
सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत घट title=

नवी दिल्ली : करवाचौथच्या मुहूर्तावर घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घट दिसून आलीय. दिवाळीही तोंडावर आल्यानं ग्राहकांनीही बाजाराकडे धाव घेतलीय. 

घरगुती बाजारात सराफा बाजारात स्टँडर्ड सोन्याची किंमत 26,675 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहचलीय. गेल्या शनिवारी सोन्याची किंमत 26,850 रुपये प्रति दहा ग्राम होती. 

gold rate today in mumbai

  22-Carat 24-Carat Change (%)
Current Price 26060 27871.66 -1.51% 
Previous Price 26460 28299.47

तर शुद्ध सोन्याची किंमत 135 रुपयांनी घसरून 26,825 वर पोहचलीय. बुधवारी याची किंमत 27,000 रुपये प्रति दहा ग्राम होती. 

चांदीची किंमत 130 रुपये प्रति किलोनं घसरलीय. गेल्या आठवड्यात चांदीची किंमत प्रति किलो 37,740 रुपये होती. 

लंडनमध्येही सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली होती. तसंच हा ट्रेंड अमेरिकेतही पाहायला मिळाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.