सोन्या-चांदीच्या किंमती गडगडल्या

आज राजधानी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याच्या किंमत 160 रुपयांनी केसळून 26,880 रुपये प्रति 10 ग्रामवर येऊन पोहचलाय.  

Updated: Dec 3, 2014, 08:16 PM IST
सोन्या-चांदीच्या किंमती गडगडल्या title=

नवी दिल्ली : आज राजधानी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याच्या किंमत 160 रुपयांनी केसळून 26,880 रुपये प्रति 10 ग्रामवर येऊन पोहचलाय.  

 आंतरराष्ट्रीय बाजारात औद्योगिक धर्तीवर कमी झालेल्या मागणीमुळे चांदीच्या किंमतीतही 100 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. चांदीची किंमत आता 36,900 रुपये प्रति किलोवर पोहचलीय.

बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्य स्थितीत दाग-दागिने आणि छोट्या ग्राहकांची घटलेली मागणी याशिवाय बदललेल्या आंतरराष्ट्रीय वातावरणामुळे मुख्यत: सोन्या चांदीच्या किंमती घसरल्यात. 

दिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याच्या किंमती अनुक्रमे 26,880 रुपये आणि 26,680 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहचलीय. काल सोन्यात 840 रुपयांची एका दिवसातील सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली होती. काल 27,040 रुपये प्रति 10 ग्रामवर बाजार बंद झाला होता. 

सोन्याप्रमाणेच चांदीचीही किंमत 36,900 रुपये प्रति किलोग्रॅम आणि साप्ताहिक डिलिव्हरीच्या किंमती 270 रुपयांनी घसरून 36,070 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचलीय. दुसरीकडे लग्नसराई असल्यानं चांदीच्या नाण्यांची मागणी कायम राहिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.