सोने - चांदीच्या भावात घसरण

सोन्याचा दर ३० हजारांच्या घरात पोहोचला असतानाच भावात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. सोने खरेदी होत नसल्याने सोन्याच्या किमतीत ही घसरण पाहायला मिळाली.

Updated: May 31, 2016, 09:51 AM IST
सोने - चांदीच्या भावात घसरण title=

नवी दिल्ली : सोन्याचा दर ३० हजारांच्या घरात पोहोचला असतानाच भावात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. सोने खरेदी होत नसल्याने सोन्याच्या किमतीत ही घसरण पाहायला मिळाली.

दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांनी खरेदी करण्यावर भर न दिल्यामुळे सोने किंमत घाली आहेय. सोमवारी सराफा बाजारात सलग तिसर्‍या सत्रात घसरण पाहायला मिळाली.

राजधानी दिल्लीत सोने घसरून २८,६६५ रुपये तोळा झाले, तसेच चांदीही घसरून प्रतिकिलो ३९ हजार रुपयांच्या खाली आली. जागतिक बाजारातील घसरणीचा फटकाही सराफा बाजाराला बसला. त्यामुळे भविष्यात सोने दर आणखी घाली येण्याची शक्यता आहे.