सोनं-चांदी पुन्हा महागणार!

प्लॅटिनमवरील आयात शुल्क वाढवून त्याचा दर १० टक्के करण्यात आलाय. तर सोनं आयातीवर अंकुश लावण्यासाठी तिसऱ्यांदा आयात शुल्क दरात दुरुस्ती करण्यात आलीय. त्यामुळं सरकारला ४ हजार ८३० कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न होईल.

| Updated: Aug 13, 2013, 07:49 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
प्लॅटिनमवरील आयात शुल्क वाढवून त्याचा दर १० टक्के करण्यात आलाय. तर सोनं आयातीवर अंकुश लावण्यासाठी तिसऱ्यांदा आयात शुल्क दरात दुरुस्ती करण्यात आलीय. त्यामुळं सरकारला ४ हजार ८३० कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न होईल.
अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी संसदेत सादर केलेल्या अधिसूचनेनुसार सोनं आणि प्लॅटिनमवर आयात शुल्क ८ टक्क्यांवरुन १० टक्के, तसंच चांदी ६ टक्क्यांवरुन वाढवत १० टक्के करण्यात आलंय. केंद्रीय महसूल सचिव सुमित बोस यांनी पत्रकारांना माहिती दिली की, ‘सरकार आता अनावश्यक वस्तूंच्या आयातीवर प्रस्तावित शुल्क वाढीबाबत काम करतंय’. अर्थमंत्र्यांनी कालच अनावश्यक वस्तूंवरील आयात शुल्क वाढवण्यासंबंधीचे संकेत दिले होते.
आयात शुल्क दरात केलेल्या वाढीचं उद्दीष्ट्य पैसे जमवणं नाही, तर बहुमूल्य अशा धातूंच्या आयातीवर अंकुश लावणं आणि चालू खात्यातील तूट भरून काढणं हे होय. सोन्याचा भाव ६०० रु. प्रति ग्राम वाढेल असं, ही अधिसूचना लागू होताच सराफा व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव ५६५ रु. वाढून मागील चार महिन्यांमधला जास्त म्हणजे २९ हजार ८२५ ग्रामवर गेला.

एप्रिल ते जुलै महिन्यादरम्यान सोन्याची आवक ८७ टक्क्यांनी वाढली होती. ३८३ टन सोनं भारतात आयात करण्यात आलं होतं. मागील वर्षी तिच संख्या २०५ टनवर होती. रुपयांच्या आकडेवारीनुसार या एवढ्याच वेळात सोन्याच्या आयातीत ६८ टक्क्यांनी वाढ होऊन 56,488 कोटी रुपयांवरुन वाढून 95,092 कोटी रुपयांवर गेलं होतं.
तर दुसरीकडे रुपयांच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जुलै महिन्यादरम्यान चांदीच्या आयातीत २०० टक्के वाढ होऊन चांदी 12,789 कोटी रुपयांवर पोहोचली. मागील वर्षी याच काळात जी 4,281 कोटी इतके रुपये होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.