सोने-चांदी दरात पुन्हा घट

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, May 16, 2013 - 19:02

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सोने दरात पुन्हा घरसरण पाहायला मिळाली. प्रति तोळा ( दहा ग्रॅम) पाचशे रुपयांनी सोने उतरले आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीने या महिन्यातील नीचांक गाठलाय. तर चांदीच्या दरात एक हजार रूपयांनी घट झाली.
राजधानी नवी दिल्लीमध्ये एक तोळ्याचा भाव २६,८०० रुपये एवढा आहे. जगभरातील सोन्याचे भाव उतरल्यानंतर थोडीशी भाववाढ होताच साठेबाजांनी मोठ्या प्रमाणावर सोने विक्री केल्याने भाव उतरले.
गुरुवारी अचानक ६०० रुपयांनी सोने दरादरात घसरण झाली होती. मात्र, १७एप्रिल रोजीच्या सोने दराशी बरोबरी झाली होती. त्यानंतर आज पुन्हा ५०० रुपयांची घसरण झाली आहे.

सिंगापूरमधील सोन्याच्या उलाढालींवरून सामान्यतः देशांतर्गत सोन्याचे भाव ठरतात. सिंगापूरमधील सोन्याचे भाव ०.४ टक्क्यांनी उतरले आहेत. हा १९ एप्रिलनंतरचा नीचांक आहे. चांदीचे दरदेखील एक हजार रुपयांनी कमी होऊन प्रतिकिलो ४३,७०० रुपये एवढे झाले आहेत.
प्रमुख शहरातील भाव
मुंबई - २४३२० (२२ कॅरेड)
२६५३० (२४ कॅरेड)
नवी दिल्ली - २४८०० (२२कॅरेड)
२७२३० (२४ कॅरेड)
कोलकाता - २४९६१ (२२कॅरेड)
२७२३० (२४ कॅरेड)
चेन्नई - २४९६१ (२२कॅरेड)
२७२३० (२४ कॅरेड)

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 16, 2013 - 18:56
comments powered by Disqus