सोने, चांदी दरात पुन्हा घसरण

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, June 22, 2013 - 17:33

www. 24taas.com, झी मीडिया, मुंबई
जागतिक उलाढालीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. त्यानंतर सोने दरात वाढ झाली होती. गेल्या दोन आठवड्यातील सोन्याच्या भावात झालेली ही सगळ्यात मोठी घसरण आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण दिसून आली असून प्रतितोळ्यामागे ६२० रुपयांची घसरण झाली आहे.
आज सोन्याचा भाव प्रतितोळा २७,३८० रूपयांवर आला आहे. सोन्याचा हा गेल्या दोन आठवड्यातला सर्वात कमी दर आहे. सोन्याबरोबरच चांदीचा भावही घसरला आहे. चांदीचा भाव किलोमागे १४ हजार रूपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारतील अस्थीर आर्थिक परिस्थितीचा सोने-चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

अमेरिकन फेडरल बँकेने यावर्षी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम गुंडाळण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे साठेबाजांनी सोन्याची विक्री सुरू केली आहे. परिणामी सोन्याचा भाव घसरल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शनिवारी सोन्याचा भाव दोन आठवड्यात कमी झाला. शनिवारी राजधानी नवी दिल्लीमध्ये १० ग्रॅम २७,६४० एवढा होता. तेथे सोने २६० रूपयांनी केली झाले. तर चांदी ६०० रूपयांनी कमी झाली. किलोमागे चांदी ४२,३०० रूपये असा दर होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 22, 2013 - 17:33
comments powered by Disqus