देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय

देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना वायफाय सुविधा मिळणार आहे. पहिला अर्धा तास ही सुविधा मोफत देण्यात येईल. त्यानंतर मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील. 

Updated: Aug 16, 2015, 07:57 PM IST
देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय  title=

नवी दिल्ली: देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना वायफाय सुविधा मिळणार आहे. पहिला अर्धा तास ही सुविधा मोफत देण्यात येईल. त्यानंतर मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील. 

या पंचवीस पर्यटन स्थळांमध्ये दिल्लीतला लाल किल्ला, मुंबईच्या एलिफन्टा गुहा, कर्नाटकातलं हंपी, फतेहपूर सिक्री,सारनाथ मंदिर, कोणार्क मंदिर, मध्यप्रदेशातल्या खजूराहो आणि ओडीशातल्या सूर्यमंदिराचा समावेश आहे.  

ताज महाल परिसरात सर्वात पहिल्यांदाही सुविधा सुरु करण्यात आलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.