गोपाळ कांडाची शरणागती

By Jaywant Patil | Last Updated: Saturday, August 18, 2012 - 08:05

www.24taas.com, नवी दिल्ली
एअरहोस्टेस गीतिका शर्मा आत्महत्याप्रकरणी आरोपी आणि हरियाणाचा माजी मंत्री गोपाळ कांडाने दिल्लीच्या अशोक विहार पोलिस ठाण्यात पहाटे 4च्या सुमारास सुमारास सरेंडर केलंय.
सरेंडर केल्यानंतर पोलिसांनी कांडाला अटक केलीय. काल रात्रभर दिल्लीच्या अशोक विहार पोलीस ठाण्यात कांडाच्या सरेंडरबाबत नाट्य रंगलं होतं. गेल्या 10 दिवसांपासून कांडा फरार होता. शुक्रवारी कोर्टानंही कांडाचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
त्यामुळं देशभरातून होणारा आक्रोश लक्षात आल्यानंतर कांडानं सरेंडर करणं शहाणपणाचं समजलं. दरम्यान गोपाळ कांडाची माहिती लपवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याचा भाऊ गोविंद यालाही काल रात्री अटक केलीय..

First Published: Saturday, August 18, 2012 - 08:00
comments powered by Disqus