संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राज्यसभेतील विरोधी पक्षाची ताकद लक्षात घेता त्यांची मनधरणी करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जातंय. 

Updated: Feb 22, 2015, 12:11 PM IST
संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन   title=

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राज्यसभेतील विरोधी पक्षाची ताकद लक्षात घेता त्यांची मनधरणी करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जातंय. 

संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी सर्वच पक्षांतील वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधत बैठकीला उपस्थीत रहाण्याचं आवाहन केलंय. उद्यापासून सुरु होणारं संसदेचं अधिवेशन वादळी ठरमयाची शक्यता आहे. विरोधकांनी 'अध्यादेश राज'वरुन सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. 

विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सहा महत्त्वाची विधेयकं राज्यसभेत मंजूर करुन घेताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भूसंपादन कायद्यात सरकारनं घाईघाईने केलेल्या दुरुस्त्यांवरही विरोधक नाराज आहेत. त्यात संघ परिवारातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच मिळालय. त्यामुळे हे अधीवेशन वादळी ठरण्याची चिन्ह आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.