गोवा सरकारकडून गांधी जयंतीची सुट्टी रद्द

गोव्यातील भाजपा सरकारने महात्मा गांधी जंयतीची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेऊन एका नव्या वादाला वाचा फो़डली आहे. यावरून काँग्रेसने गोव्यातील भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे.

Updated: Mar 15, 2015, 06:33 PM IST
गोवा सरकारकडून गांधी जयंतीची सुट्टी रद्द  title=

पणजी : गोव्यातील भाजपा सरकारने महात्मा गांधी जंयतीची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेऊन एका नव्या वादाला वाचा फो़डली आहे. यावरून काँग्रेसने गोव्यातील भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे.

गोवा सरकारने सरकारी वार्षिक सुट्ट्यांची यादी नुकतीच जाहीर केली. मात्र त्यात २ ऑक्टोबरची गांधी जंयतीची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. गोव्यातील शाळांना या दिवशी सुट्टी असेल मात्र सरकारी कामकाज या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मागील वर्षीपर्यंत यादिवशी सुट्टी दिली जात होती मग यावर्षी ही सुट्टी का रद्द करण्यात आली असा प्रश्न काँग्रेसचे स्थानिक नेते दुर्गादास कामत यांनी उपस्थित केला आहे.  तसेच आता गोवा नथुराम गोडसे यांच्या जन्मदिनी सुट्टी द्यायला नको म्हणजे झालं, असा टोलाही त्यांनी लगावला. 
 
एकीकडे ब्रिटनमध्ये महात्मा गांधीजींचा भव्य पुतळ्याचे अनावरण होत असताना गोवा सरकारने असे कृत्य करणे दुर्दैवी असल्याचे काँग्रेस प्रवक्त्यांनी म्हटले आहे.