विदेशी दुकानदारीला ५१ टक्के सरकारची मान्यता

सरकारने आणखी एक कडक निर्णय घेऊन खळबळ निर्माण केली आहे. कालच डिझेलच्या दरात वाढ आणि गॅसच्या सबसिडी नाकरण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आले.

Updated: Sep 14, 2012, 06:47 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
सरकारने आणखी एक कडक निर्णय घेऊन खळबळ निर्माण केली आहे. कालच डिझेलच्या दरात वाढ आणि गॅसच्या सबसिडी नाकरण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आले. आणि त्याला २४ तास उलटत नाही तर केंद्र सरकारनं मल्टी ब्रॅण्ड रिटेलमध्ये ५१ टक्के गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.
त्यामुळे वॉलमार्टसह आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक बड्या कंपन्यांना भारतात प्रवेशाचे दरवाजे खुले होणार आहेत. यासह नागरी हवाई वाहतुक क्षेत्रात ४९ टक्के परदेशी गुंतवणुकीलाही मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे. रिटेलमध्ये परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला तृणमूल काँग्रेसने विरोध केला आहे.
`आर्थिक सुधारणांसाठी सरकार आक्रमक आहे`. कॅबिनेट बैठकीत सरकारची आरपारची भुमिका घेतली आहे. `जावेच लागले तर लढून जाऊ` असं म्हणतं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निर्वाणीचीच भाषा केली आहे. आजवर मनमोहन सिंग यांनी केलेले हे कठोर वक्तव्य आहे.