पान-मसाला गुटख्यावर २३२ टक्के जीएसटी, महागड्या बाईक आणि खासगी जेटवर ३१ टक्के उपकर

 वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेनुसार ३५० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा अधिक मोटारसायकल, खासगी जेट विमान आणि महाग आलिशान बोटी यांच्या खरेदीवर ३१ टक्के जीएसटी लागणार आहे. पान मसाला गुटखावर जीएसटीच्या शीर्ष दरावर २०४ टक्के उपकर असणार आहे. जीएसटी एक जुलैपासून लागू होणार आहे. 

प्रशांत जाधव | Updated: May 19, 2017, 07:28 PM IST
   पान-मसाला गुटख्यावर २३२ टक्के जीएसटी, महागड्या बाईक आणि खासगी जेटवर ३१ टक्के उपकर

श्रीनगर :  वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेनुसार ३५० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा अधिक मोटारसायकल, खासगी जेट विमान आणि महाग आलिशान बोटी यांच्या खरेदीवर ३१ टक्के जीएसटी लागणार आहे. पान मसाला गुटखावर जीएसटीच्या शीर्ष दरावर २०४ टक्के उपकर असणार आहे. जीएसटी एक जुलैपासून लागू होणार आहे. 

श्रीनगरमध्ये दोन दिवसीय जीएसटी परिषद सुरू आहे, त्यात हा फैसला घेण्यात आला आहे. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सर्व कार, बस, ट्रक आणि मोपेड आणि मोटरसायकलीसह वैयक्तीक वापरांसाठीचे विमान, लक्झरी बोटींवर सर्वाधिक २८ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या कार, एसयूव्ही आणि ३५० सीसी इंजिनच्या मोटारसायकलवर अतिरिक्त उपकर लावण्यात आला आहे. 

खासगी विमान, लक्झरी बोटी आणि ३५० सीसीपेक्षा अधिक इंजिन क्षमताच्या मोटार सायकलींवर २८ टक्के जीएसटीवर तीन टक्के उपकर लावण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचा एकूण कर ३१ टक्के होणार आहे. तसेच चार मीटरपेक्षा कमी लांबी असलेल्या आणि १२००सीसी पेट्रोल इंजिन कारवर २८ टक्क्यांवर एक टक्के उपकर लागणार आहे. १५०० सीसी पेक्षा कमी क्षमता असलेल्या छोट्या डिझेल कारवर जीएसटीच्या शीर्ष दरावर तीन टक्के उपकर लावण्यात येणार आहे. 

अशा प्रकारे मध्यम आकारच्या कार, एसयूव्ही आणि लक्झरी कारवर २८ टक्के जीएसटी दरावर १५ टक्के उपकर लावणार आहे. बस किंवा असे वाहने ज्यात १० पेक्षा अधिक जण बसतात त्यांच्यावरही वरील पद्धतीने उपकर लागू होणार आहे. 

१५०० सीसीपेक्षा अधिक इंजिन क्षमता असलेल्या हायब्रीड कारवरही जीएसटीवर १५ टक्के उपकर लावण्यात येणार आहे. एरेटीड पेय आणि लिंबू पाणीच्या शीर्ष दरावर १२ टक्के उपकर लागणार आहे.

पान मसाला गुटक्यावर २८ टक्के जीएसटी लागणार असून त्यावर २०४ टक्के उपकर लावण्यात येणार आहे.