3 पॉर्न फिल्म दाखवून मोनिका घुरडेवर रेप, मग हत्या

गोव्यातील प्रसिद्ध परफ्युम एक्स्पर्ट मोनिका घुरडेच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या कबुली जबाबनंतर  पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आहेत. 

Updated: Oct 12, 2016, 05:21 PM IST
3 पॉर्न फिल्म दाखवून मोनिका घुरडेवर रेप, मग हत्या title=

पणजी : गोव्यातील प्रसिद्ध परफ्युम एक्स्पर्ट मोनिका घुरडेच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या कबुली जबाबनंतर  पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आहेत. 

मोनिकाची हत्या होण्यापूर्वी तिला तीन पॉर्न फिल्म दाखविल्या आणि मग  तिच्यावर बलात्कार  केल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. आरोपी राजकुमार सिंहने गुन्हाची कबुली करताना दिली आहे.

मूळ पंजाबचा असलेला 21 वर्षीय राजकुमार सिंह हा मोनिकाच्या अपार्टमेंटमध्येच सुरक्षारक्षक होता. पण काही दिवसांपूर्वी त्याला मोनिका आणि इतर रहिवाशांच्या तक्रारीवरून काढून टाकण्यात आलं होतं. त्याचाच राग मनात ठेऊन राजकुमारनं मोनिकाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे ही हत्या पूर्वनियोजित असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

राजकुमार मोनिकाच्या घरी जबरदस्ती घुसला. त्यानंतर तिला चाकूच्या धाकाने तिला आतमध्ये नेलं. त्यानंतर आरोपीने मोनिकाचे हातपाय बेडला बांधले. तिच्याकडे पैशांची मागणी केली. घाबरलेल्या मोनिकाने राजकुमारला पर्समधील पैसे घेण्यास सांगितलं. त्यातील चार हजार रुपयांवर त्याचं समाधान न झाल्याने तिने आपलं एटीएम कार्डही पासवर्डसह घेण्यास सांगितलं.

मोनिका घुरडे यांचा मृतदेह गोव्यातील त्यांच्या घरी आढळून आला होता. मोनिका या मूळच्या महाराष्ट्राच्या असून त्या जे.जे स्कूल ऑफ आर्टस् च्या विद्यार्थिनी होत्या. परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी त्यांनी फोटोग्राफर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही काम केलं होतं.

गोव्यात भाड्यानं घेतलेल्या घरात त्यांचं वास्तव्य होतं आणि याच घरी हातपाय बांधलेल्या नग्न अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती.