देशात मोदी फिव्हर, नमो अल्बम लॉन्च

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी आजचा दिवस खास आहे. कारण मोदींचा आज ६३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. गुजरातपासून दिल्लीपर्यंत वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Sep 17, 2013, 11:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी आजचा दिवस खास आहे. कारण मोदींचा आज ६३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. गुजरातपासून दिल्लीपर्यंत वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.
मोदी साधेपणाने आपला वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र यंदा पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजपमध्ये उत्साह संचारलाय. देशभरात मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ठिकठिकाणी आतषबाजी, होमहवनचं आयोजन करण्यात आलंय.. शिवाय मोदींना शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे होर्डिग्सही पाहायला मिळत आहेत.
६३ वर्षात पदार्पण करणा-या नरेंद्र मोदींवर शुभेच्छा आणि गिफ्टचा वर्षाव होतोय.एकीकडे वाढदिवसाचा जल्लोष असताना ब्रँड मोदींचा जलवाही पाहायला मिळतोय. मुंबईत मोदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला नमो अल्बम लॉन्च करण्यात आला.
तरुणाईमध्ये मोदींची लोकप्रियता वाढतेय. त्यामुळेच कॉलेज ग्रुप सी कार्डज बॅनर अंतर्गत मोदींवर नमो अँथम नावाचा म्युझिक अल्बम लॉन्च करण्यात आलाय.
तरुणांना मोदींना समर्थन देण्याचं अपील करण्यात आलंय. तर दुसरीकडे मोदी फिव्हर मिठाईवरही पाहायला मिळतोय. नमो मिठाई नावाचा पेढा जामनगरमध्ये पसंती मिळत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ