मतदान अनिवार्य करण्याचा निर्णय अयोग्य : एच.एस.ब्रह्मा

मतदान अनिवार्य करण्याच्या गुजरात सरकारचा निर्णय अयोग्य असल्याचं मत केंद्रीय निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रह्मा यांनी म्हटलं आहे. मतदान न केल्यास कायदेशीर कारवाईचा व्हावी असा प्रस्ताव गुजरात सरकारचा आहे.

Updated: Nov 11, 2014, 07:19 PM IST
मतदान अनिवार्य करण्याचा निर्णय अयोग्य : एच.एस.ब्रह्मा title=

मुंबई : मतदान अनिवार्य करण्याच्या गुजरात सरकारचा निर्णय अयोग्य असल्याचं मत केंद्रीय निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रह्मा यांनी म्हटलं आहे. मतदान न केल्यास कायदेशीर कारवाईचा व्हावी असा प्रस्ताव गुजरात सरकारचा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान अनिवार्य करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्व बाजूंनी विचार केल्यास योग्य नसल्याचे दिसते, असंही निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी व्यक्त केले आहे.

एच. एस. ब्रह्मा यांनी 'द इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही भूमिका मांडली.

गुजरातच्या माजी राज्यपाल कमला बेनीवाल यांनी गेल्या काही वर्षांपासून हे विधेयक प्रलंबित ठेवले होते. त्यावर सध्याचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी नुकतीच स्वाक्षरी केली. त्यामुळे या विधेयकातील तरतुदी गुजरातमध्ये लागू झाल्या आहेत. 

अनेक विधिज्ञ आणि अभ्यासक यांनी हा कायदा घटनेच्या चौकटीत वैध आहे का, याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार मतदान न करणाऱया नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, हा दंड नेमका किती असेल, हे अद्याप ठरविण्यात आलेले नाही. 

ब्रह्मा म्हणाले, हा विषय गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानापुरता मर्यादित असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग ठोसपणे कोणतीही भूमिका मांडणार नाही. परंतु, मला असे वाटते की, अशा पद्धतीने मतदान अनिवार्य करणे चुकीचे ठरू शकते. 

जर हाच कायदा केंद्रात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ८३ कोटींहून अधिक मतदारांपैकी १० टक्के मतदारांनी मतदान केले नाही. तर तुम्ही आठ कोटी मतदारांना तुरुंगात टाकणार का आणि त्यांच्याकडून दंड वसूल करणार का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.