लग्नानंतर काही सेंकदातच तरुणी झाली विधवा

लग्नानंतर काही सेकंदातच एक तरुणी विधवा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर काही सेंकदातच तिच्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. भोजपूरमधल्या आरा येथील ही घटना आहे. गोळ्या घालून हल्लेखोर फरार झाला. दोन्ही कुटुंबामध्ये यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Updated: May 8, 2017, 09:17 PM IST
लग्नानंतर काही सेंकदातच तरुणी झाली विधवा title=

भोजपूर : लग्नानंतर काही सेकंदातच एक तरुणी विधवा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर काही सेंकदातच तिच्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. भोजपूरमधल्या आरा येथील ही घटना आहे. गोळ्या घालून हल्लेखोर फरार झाला. दोन्ही कुटुंबामध्ये यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नवरदेवाला गोळ्या घातल्यानंतर जागेवरच त्याचा मृत्यू झाला. सुधीर कुमार हा आपल्या आई सोबत राहत होता. त्याचे वडील काही वर्षांआधीच त्यांना सोडून चालले गेले होते. आता सुधीर देखील त्याच्या आईला एकटा सोडून गेला आहे. ज्या घरात नव्या सुनेचं आगमन होणार होतं तेथे आता दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोणीतर सुधीरला मागून गोळी घालून फरार झाल्याचं त्याच्या मामाचं म्हणणं आहे. अशी बातमी एका हिंदी वेबसाईटने दिली आहे.