मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, पाच मुली ताब्यात

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, April 23, 2014 - 10:26

www.24taas.com, झी मीडिया, गुडगाव
गुडगावमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड करणयात आलाय. कारवाईच्यावेळी 5 मुली आणि एका ग्राहकाला अटक करण्यात आली आहे.
गुडगाव पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अनंतरा स्पा मसाज पार्लरवर छापा टाकण्यात आला. या पार्लरमध्ये सेक्स रॅकेट चालविले जात असल्याचे बोलले जात होते. पार्लरच्या नावाखाली सेक्स बाजार सुरु अल्याचे स्पष्ट झाले आहे. 5 मुली आणि एका ग्राहकाला रंगहात पोलिसांनी पकडले.
ताब्यात घेण्यात आलेल्या मुली या मणिपूरमधील आहेत. पोलिसांनी पाचही मुली आणि ग्राहकाची मेडिकल करण्यात आली. पोलिसांनी या सर्वांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. दरम्यान, मसाज पार्लर चालविणाऱ्या संचालिकेला पोलिसांनी अद्याप अटक केलेले नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 23, 2014 - 10:20
comments powered by Disqus