दहशतवादी हाफिज सईदची झी न्यूजला धमकी

नवी दिल्ली :  भारतीय पॅरा मिलिट्री कमांडो संदर्भात निर्भीड  कव्हरेज केल्याचा राग येऊन,  कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दवाह चा म्होरक्या हाफीज सईद याने शुक्रवारी भारताच्या सर्वात मोठे मीडिया हाऊस असलेल्या झी न्यूजला धमकी दिली. 

Updated: Sep 30, 2016, 06:25 PM IST
दहशतवादी हाफिज सईदची झी न्यूजला धमकी title=

नवी दिल्ली :  नवी दिल्ली :  भारतीय पॅरा मिलिट्री कमांडो संदर्भात निर्भीड  कव्हरेज केल्याचा राग येऊन,  कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दवाह चा म्होरक्या हाफीज सईद याने शुक्रवारी भारताच्या सर्वात मोठे मीडिया हाऊस असलेल्या झी न्यूजला धमकी दिली. 

भारताच्या ज्या पॅरा मिलिट्री कमांडो यांनी काल पाक व्याप्त काश्मीरात घुसून दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. या पॅरा मिलिट्री कमांडोवर झी न्यूजने विशेष शो केला. त्यावर चिडून हाफीज सईदने धमकी दिली आहे. 

काय दिली धमकी 

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफीस सईद झी न्यूजच्या कव्हरेज पाहून म्हणाला की, प्रत्येक भारतीयाला धडा शिकवावा लागेल, की कसा असो सर्जिकल स्ट्राईक... आता पाकिस्तानी सैनिक भारताला सांगतील की काय असतो सर्जिकल स्ट्राइक... 

तसेच सईदने झी न्यूजला धमकी दिली की इनशाँ  अल्लाह, झी न्यूजला आम्ही सांगू की काय असते सर्जिकल स्ट्राइक...

भारताला सर्जिकल स्ट्राइकबद्दल लवकरच धडा शिकवला जाईल अशीही धमकी त्याने दिली आहे. 

सईदने आज पाक व्याप्त काश्मीरात आयोजित केलेल्या सभेत बोलत होता.