बेड्या घालून गर्लफ्रेंडशी करावं लागलं लग्न

बिहारमधील जमुई येथे आरोपी दिग्विजय कुमार पासवान याला बेड्या घालून लग्न करावं लागलं आहे. दिग्विजय कुमार पासवान याला जमुई सिव्हील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याच्या गर्लफ्रेंडशी सक्तीने लग्न करावे लागले आहे.

Updated: Aug 25, 2016, 05:05 PM IST
बेड्या घालून गर्लफ्रेंडशी करावं लागलं लग्न title=

पटना : बिहारमधील जमुई येथे आरोपी दिग्विजय कुमार पासवान याला बेड्या घालून लग्न करावं लागलं आहे. दिग्विजय कुमार पासवान याला जमुई सिव्हील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याच्या गर्लफ्रेंडशी सक्तीने लग्न करावे लागले आहे.

आरोपी दिग्विजय कुमार पासवानचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मागील चार वर्षापासून प्रेमसंबध होते. या दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद झाल्याने आरोपी दिग्विजय कुमारने आपल्या गर्लफ्रेडचा अश्लील व्हिडिओ सोशल नेटवर्किग साइट्सवर टाकला होता.

या घटनेनंतर त्याच्या गर्लफ्रेंडने आरोपी दिग्विजय कुमार पासवानच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिग्विजयला अटक केली. कोर्टाच्या आदेशानुसार आरोपी दिग्विजयचे गर्लफ्रेडबरोबर लग्न लावून त्याच्या गर्लफ्रेंडला तिच्या सासरी पाठवले तर आरोपी दिग्विजयला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.