हरभजनसिंग वैमानिकावर संतापला...

 जेट एअरवेजच्या वैमानिकांने एका भारतीय दिव्यांग महिलेला वर्णभेदी शेरेबाजी करून गैरवर्तणूक केल्याने भारतीय क्रिकेटपटू हरभजनसिंग चांगला संतापला आहे. 

Updated: Apr 26, 2017, 03:28 PM IST
हरभजनसिंग वैमानिकावर संतापला... title=

नवी दिल्ली :  जेट एअरवेजच्या वैमानिकांने एका भारतीय दिव्यांग महिलेला वर्णभेदी शेरेबाजी करून गैरवर्तणूक केल्याने भारतीय क्रिकेटपटू हरभजनसिंग चांगला संतापला आहे. 

ट्विटरवरून हरभजन सिंग याने जेट एअरवेजवर हल्लाबोल केला आहे.  सर्वांना अशा घटनाविरोधात आवाज उचलण्याचे आवाहन केले आहे. 

हरभजन सिंगनं काय ट्विट केलंय पाहूया.... 

जेट एअरवेजच्या ब्रेण्ड होसिलिन यानं भारतीयांचा अपमान केलाय. भारतीय भूमीत कमावत असूनही त्याने विमानात गैरवर्तणूक केलीय.  दिव्यांग प्रवाशाशी त्याने गैरवर्तणूक केलीय. तसंच त्याने महिलांचाही अवमान केलाय, अशा घटनांना थारा द्यायला नको. या घटना रोखण्यासाठी सारे एकत्र येऊ या.