'गुगल बॉय'च्या घरात चोरी, पुरस्कारही गायब

‘गूगल बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौटिल्यच्या हरियाणातील राहत्या घरी चोरीची घटना घडलीय. 

Updated: Nov 20, 2014, 05:42 PM IST
'गुगल बॉय'च्या घरात चोरी, पुरस्कारही गायब title=

हरियाणा : ‘गूगल बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौटिल्यच्या हरियाणातील राहत्या घरी चोरीची घटना घडलीय. 

अनेक किंमती सामानावर चोरानं अलगद हात फिरवलाय. इतकंच नाही तर कौटिल्यनं आत्तापर्यंत जिंकलेल्या अनेक पुरस्कारांनाही या चोरानं सोडलेलं नाही. 

ही घटना घडली तेव्हा कौटिल्य आपल्या कुटुंबीयांसहीत प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या ‘कॉमेड़ी नाईटस् विथ कपिल’च्या शूटींगसाठी मुंबईला आला होता.

कौटिल्यचे आजोबा पंडित जयकिशन शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते तीन दिवसांसाठी मुंबईला गेले होते तेव्हा घरौंडा स्थित त्यांच्या घरावर चोरांनी हात साफ केला... घरातील अनेक किंमती सामान गायब आहे. या घटनेची बातमी मिळताच कौटिल्यचे आजोबा आपल्या घरी पोहचले तेव्हा घराच्या खिडकीच्या काचा तुटलेल्या होत्या. फ्रिज, इन्व्हर्टर, लॅपटॉप, आयपॅड, गॅस शेगडी तसंच कौटिल्यनं जिंकलेले अनेक पुरस्कार गायब आहेत. 

पोलिसांनी या घटनेची नोंद करून चोरांचा शोध सुरू केलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.