ऑन ड्युटी पोलीस महिला कर्मचाऱ्याच्या मांडीवर बसतो तेव्हा...

गुजरातमध्ये मुलीसोबत डान्स करत असतानांचा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला आणि त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं गेलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका पोलीस कर्मचाऱ्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

Updated: Dec 1, 2015, 08:42 PM IST
ऑन ड्युटी पोलीस महिला कर्मचाऱ्याच्या मांडीवर बसतो तेव्हा... title=

जम्मू : गुजरातमध्ये मुलीसोबत डान्स करत असतानांचा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला आणि त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं गेलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका पोलीस कर्मचाऱ्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

जम्मू-काश्मिरमधील राजौरी जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यातील हा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक हेड कॉन्सटेबल हा एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मांडीवर जाऊन बसला असल्याचं दिसत आहे. 

सोशल मिडियामध्ये हा फोटो व्हायरल झाल्यानंतर झाकिर हुसैन या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.