रेल्वेची प्रवाशांसाठी खुशखबर...

तुम्हाला कुठेतरी जायचं आहे... आणि त्यासाठी तुम्ही रेल्वेचा वापर करणार आहात. अशावेळी रेल्वेची इत्थंभूत माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आता रेल्वे प्रशासनाची मदत होणार आहे. 

Updated: Apr 23, 2017, 09:17 PM IST
रेल्वेची प्रवाशांसाठी खुशखबर...  title=

मुंबई : तुम्हाला कुठेतरी जायचं आहे... आणि त्यासाठी तुम्ही रेल्वेचा वापर करणार आहात. अशावेळी रेल्वेची इत्थंभूत माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आता रेल्वे प्रशासनाची मदत होणार आहे. 

कोणती रेल्वे किती वाजता सुटणार... कोणत्या वेळी ती कोणत्या स्टेशनवर पोहचणार? कोणत्या प्लॅटफॉर्मवर? या ट्रेनला उशीर होतोय का? गाडी रद्द केली गेलीय का? मेगाब्लॉक आहे का? सीट कन्फर्म झालंय का? इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला रेल्वेच्या 'हिंदरेल' या मोबाईल अॅपवर मिळणार आहेत.  

या अॅपवर रेल्वेचे अदययावत वेळापत्रकासहीत इतरही माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच प्रवाशांना प्रवासात त्याचा फायदाच होईल. हे मोबाईल अॅप जून महिन्यात लॉन्च केलं जाईल. 

रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक, पर्यटन पॅकेज तसेच टॅक्सीचीही अगाऊ नोंदणी, रेल्वेगाड्यांचे आगमन-प्रस्थानच्या वेळा, उशिरा धावणाऱ्या गाड्या, रद्द केलेल्या गाड्या, फलाट क्रमांक, सुटण्याच्या वेळा आणि आसन उपलब्धतेची माहिती अशा अनेक सुविधा तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत.