सहा राज्यांमध्ये कंडोमचा तुटवडा

देशातील सहा राज्यांमध्ये कंडोमचा तुटवडा जाणवत असल्याचं सांगण्यात येतंय, मात्र ही बाब एडस सारख्या रोगांचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरू शकते.

Updated: Jan 30, 2015, 11:29 PM IST
सहा राज्यांमध्ये कंडोमचा तुटवडा title=

नवी दिल्ली : देशातील सहा राज्यांमध्ये कंडोमचा तुटवडा जाणवत असल्याचं सांगण्यात येतंय, मात्र ही बाब एडस सारख्या रोगांचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरू शकते.

हा तुटवडा सरकाकडून कंडोम वाटप होतं, या पुरवठ्यात जाणवत असल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारी योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या कंडोम योजनेत ही कमतरता भासतेय.

सुदैवाने यात महाराष्ट्राचा समावेश नसला तरी, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा यात समावेश आहे.
 
या राज्यांमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून कंडोमचा पुरेसा पुरवठाच होत नसल्याची माहिती  समोर आली आहे. मात्र सरकारी योजनेतून कंडोम घेणाऱ्यांचं किती प्रमाण आहे, या देखिल एक महत्वाचा प्रश्न समोर येत आहे. 
 
मात्र हरियाणा, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशमध्ये एड्सग्रस्तांची संख्या तुलनेने जास्त आहे. मात्र याच राज्यांमध्ये कंडोमचा तुटवडा जाणवल्याने, एड्स आणखी फोफावण्याची भीती आहे. 
 
ही समस्या दूर करण्याच्या दृष्टीने सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबतची माहिती मिळवून,  राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चर्चा केली

एड्सग्रस्तांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कंडोमचा तुटवडा भरून निघाला नाही, तर ती भारताच्या दृष्टीने आणखी चिंतेची बाब असेल. भारतासारख्या देशात कंडोमचा तुटवडा असल्यामुळे, हा धोक्याचा इशारा समजला जात आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.