सुनंदा पुष्कर गूढ मृत्यू: झी मीडियाचा मोठा खुलासा!

By Aparna Deshpande | Last Updated: Sunday, January 19, 2014 - 10:14

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी झी मीडियानं मोठा खुलासा केलाय. सुनंदा यांच्या मृत्यूनंतर २४ तासांत झी मीडियाच्या कॅमेऱ्यात हॉटेल लीलाची दृष्यं कैद झालीत. याच हॉटेलच्या रुम नं. ३४५ मध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळला होता..
ही रुम १७ जानेवारीला दिवसभर बंद होती.. याच रुमबाहेर डू नॉट डिस्टर्ब असा बोर्ड लावण्यात आला होता.. १७ जानेवारीला सुनंदा पुष्कर कोणालाच भेटल्या नव्हत्या. शिवाय त्यांनी दिवसभर काहीही खाल्लं नव्हतं अशी माहिती हॉटेल लीलाच्या वेटरनं दिलीय.
सुनंदा यांचा मृत्यू कसा झाला याबद्दल माहिती नसल्याचंही या वेटरनं सांगितलंय. या रुममधून कोणत्याही हालचाली नव्हत्या असंही या वेटरनं झी मीडियाला सांगितलंय.

पाहा व्हिडिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Sunday, January 19, 2014 - 09:54


comments powered by Disqus