दहा वर्षात किती जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली

मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने 30 जुलै ही तारीख फाशीसाठी निश्चित केली आहे.

Updated: Jul 29, 2015, 06:45 PM IST
दहा वर्षात किती जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली title=

मुंबई : मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने 30 जुलै ही तारीख फाशीसाठी निश्चित केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाने फाशीच्या एक दिवसआधी याकूब मेमनच्या फाशीवरील याचिका फेटाळून लावली आहे. यावरून याकूब फाशीच्या फंद्याच्या फारच जवळ असल्याचं निश्चित होतंय.

भारतात आतापर्यंत किती जणांना फाशी सुनावण्यात आली आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2004 पासून 2013 दरम्यान, भारतात एकूण 1 हजार 303 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.